मार्कंडा यात्रेदरम्यान हरवलेल्या ४७ बालकांना केले पालकांना सुपूर्द
गडचिरोली TODAY
गडचिरोली : पोलीस अधिक्षक कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय व चाईल्ड लाईन 1098 यांच्या संयुक्त विद्यमाने महाशिवरात्री निमित्त मार्कंडा देव येथे यात्रेदरम्यान बालकांकरिता मदत केंद्र सुरु करण्यात आले होते. यामाध्यमातून यात्रेदरम्यान हरविलेल्या 0 ते 18 वयोगटातील एकूण ४७ बालकांना त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आले. सोबतच बालसंरक्षण विषय जनजागृती करण्यात आली.
सदर कार्य जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरणुले, बाल संरक्षण अधिकारी प्रियंका आसुटकर, सामाजिक कार्यकर्ता जयंत जथाडे, तनोज ढवगाये, लेखापाल पूजा धमाले, क्षेत्र कार्यकर्ता रवींद्र बंडावार, निलेश देशमुख, चाईल्ड लाईन प्रकल्प समन्वयक छत्रपाल भोयर, टीम मेंबर अविनाश राऊत, देवंद्र मेश्राम, मयुरी रकतसिंगे, भारती जवादे उपस्थित होते.
Post Comment
No comments