Breaking News

न्याय मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे जिप कार्यालयासमोर धरणे आंदोलन


जिप कार्यालयासमोर धरणे देतांना अंगणवाडी सेविका
 
- राज्य शासनाचा तीव्र निषेध
गडचिरोली TODAY 
गडचिरोली : न्याय मागण्यांना घेऊन राज्यभरासह जिल्ह्यातील अंगणवाडी महिलांनी 20 फेब्रुवारीपासून बेमुदत संप पुकारला आहे. दरम्यान, मंगळवारी जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी सेविकांनी रस्त्यावर उतरीत जिल्हा परिषद कार्यासमोर धरणे आंदोलन पुकारित राज्य शासनाचा तीव्र निषेध केला.
मानधन वाढीसह विविध मागण्यासंदर्भात शासन स्तरावर अंगणवाडी सेविकांचा संघर्ष सुरु होता. दरम्यान दिवाळी पूर्वी मानधन वाढ घोषित करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री त्यांनी दिले होते. त्यानंतर महिला व बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या त्रिकुटाने 26 जानेवारीला मानधन वाढीची घोषणा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात कोणताही निर्णय घेण्यात न आल्याने अंगणवाडी सेविकांनी बेमुदत संप पुकारला आहे. याचाच एक भाग म्हणून आज, मंगळवारी प्रा. दहीवडे, राजेश पिंजरकर, अमोल मारकवार, लिलता केदार यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे देत शासन विरोधात घोषणाबाजी केली. 
 यावेळी विविध मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यपालन अधिकारी यांना सादर करण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात रामदास जराते, जयश्री वेळधा, राजु सातुपुते, विठ्ठ प्रधान, भारती रामटेके, छाया कागदेलवार, सुमन तोकलवार, विठाबाई भट, संगीता वडलाकोंडावार, उर्मिला गव्हारे, सरीता आत्राम, कौशल्या गौरकार, माया नैनूरवार आदींसह जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
 

 

No comments