Breaking News

राज्य वितरण कंपनी कार्यालयासमोर ग्राम वीज सेवकांचे बेमुदत उपोषण


 आंदोलनात सहभागी ग्राम वीज सेवक

गडचिरोली TODAY 
गडचिरोली : विविध न्याय मागण्यांना घेऊन ग्रामवीज सेवक संघटनेच्या वतीने ग्राम वीज सेवकांनी 1 मार्चपासून महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी कार्यालयासमोर बेमूदत उपोषण सुरु केले आहे.
 पेसाअंतर्गत जिल्ह्यातील सात तालुक्यात ग्राम वीज सेवकांना 2016 पासून 2022 डिसेंबरपर्यत दरवर्षीप्रमाणे पुनरनियुक्ती आदेश देण्यात आले होते. मात्र 2022-2023 या सत्रात अद्यापपर्यंत त्यांना पुनरनियुक्तीचे आदेश देण्यात न आल्याने या सुशिक्षित ग्राम वीज सेवक युवकांवर बेरोजगारीची संकट कोसळले असून त्यांचवेर उपासमारीची पाळी आली आहे. यासंदर्भात अनेकदा निवेदर, अर्ज सादर करुन पुनर्नियुक्ती देण्यात आली नाही. त्यामुळे पेसा अंतर्गत नियुक्त 156 ग्राम वीज सेवकांना तत्काळ 2022-23 या वर्षाकरिता पुनरनियुक्ती आदेश देण्यात यावे, त्यांना तत्काळ कामावर सामावून घेण्यात यावे, ग्राम वीज सेवकांच्या बॅंक खात्यात मानधन जमा करावा, महागाई भत्ता 5 हजारावरुन 20 हजार करण्यात यावा, विमा कवच देण्यात यावे, आदी न्याय मागण्यांना घेऊन जिल्ह्यातील संबंधित ग्राम वीज सेवकांनी ग्राम वीज सेवक संघटनेच्या नेतृत्वात गडचिरोली येथील मुख्य वीज वितरण कार्यालयासमोर बेमूदत आमरण उपोषण छेडले आहे. मागण्या मान्य होईस्तोवर आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. यावेळी आंदोलनस्थळी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर नरोटे, उपाध्यक्ष गजानन परचाके, सचिव नैना किरंगे आदींसह सात तालुक्यातील अन्यायग्रस्त ग्राम वीज सेवक उपस्थित होते.


No comments