Breaking News

तब्बल २३ वर्षांपासून दारूविक्रीमुक्त 'या' गावाने उभारला 'विजयस्तंभ'



-इतरही गावातील दारूबंदीसाठी महिलांनी केले प्रोत्साहित
गडचिरोली TODAY
गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील उराडी गावात १ ऑगस्ट २००० पासून महिला संघटनेच्या प्रयत्नातून अवैध दारू विक्री बंद आहे. दारूविक्रीमुक्त गावाला तब्बल २३ वर्ष पूर्ण झाल्याने दारूबंदी संघटना, स्थानिक पदाधिकारी, गावकरी यांच्या सहकार्यातून व मुक्तिपथच्या मार्गदर्शनातून विजयस्तंभ उभारून उदघाटन सोहळा साजरा करण्यात आला.  
यावेळी उदघाटक म्हणून दत्तात्रय क्षीरसागर (महाराज) उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती सरपंच सोनीताई वट्टी, उपसरपंच राधेश्याम दडमल, विजय सोमवंशी, डॉ. सुमंगल मल्लिक, दारूबंदी संघटना अध्यक्ष आशाताई मरस्कोल्हे, दारूबंदी संघटना सचिव वर्षाताई सुकारे आदींची होती.
अवैध दारूविक्री बंद करून गावाला २३ वर्ष पूर्ण झाले, हि अभिनंदनीय बाब आहे. या गावापासून इतर गावांनी प्रेरणा घ्यावी, या हेतूने मुक्तिपथ कुरखेडा चमूने गावात मुक्काम करून गाव दारूबंदी संघटना सदस्य व गावकऱ्यासोबत चर्चा केली व विजयस्तंभ उभारून गावात आनंद उत्सव साजरा करण्याचे ठरवले. त्यानुसार गावाच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ दारुविक्री बंदी विजयस्तंभ उभारण्यात आला. या उपक्रमाचे उदघाटन दत्तात्रय क्षीरसागर (महाराज), सरपंच व उपसरपंच यांच्याहस्ते पार पडला. त्यांनतर सर्व उपस्थितांना संबोधित करतांना दारूबंदी संघटनेच्या महिलांनी भावुक होऊन दारूबंदी करतेवेळी झालेला त्रास कथन केला. या गावात एकूण 30 महिलांचे संघटन असून त्यांना स्थानिक पदाधिकारी व गावकरी मोठ्या उत्साहाने सहकार्य करीत आहेत. उराडीच्या या गावसंघटनेने इतरही गावांना प्रोत्साहित केले. मेंढा, सोनेरांगी, वाशी, मोहगाव या गावातील दारुविक्री बंदी करून देण्यात या महिलांचे मोलाचे योगदान आहेत. या गावाचा आदर्श घेऊन इतरही गावांनी दारूमुक्त गाव निर्माण करून गावाचा विकास करण्याचे आवाहन मान्यवरांनी केले. 
यावेळी मुक्तिपथ तालुका संघटक मयूर राऊत, प्रेरक विनोद पांडे,  दारूबंदी संघटनेच्या सक्रिय कार्यकर्त्या लीलाबाई बोरकर, कांताबाई दडमल, अनुसया सुकारे, भिवराबाई मस्के, पार्वताबाई डोंगरवार, गौरवाबाई वंजारी, मीराबाई कोकोडे, वसंता दडमल यांच्यासह दारूबंदी संघटनेच्या महिला, स्थानिक पदाधिकारी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments