Breaking News

एसटी बसचा अपघात ; 5 विद्यार्थ्यांसह 16 प्रवासी जखमी


अपघातग्रस्त बस

- आसरअल्ली-सिरोंचा मार्गावरील घटना
गडचिरोली TODAY
गडचिरोली : अनियंत्रित रापमच्या बसची रस्त्याच्या बाजुला असलेल्या झाडाला धडक बसून झालेल्या अपघातात बसमधील 5 विद्यार्थ्यांसह 16 प्रवासी जखमी झाल्याची घटना सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली-सिरोंचा मार्गावर आज घडली. 
प्राप्त माहितीनुसार, आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास आसरल्ली येथून एमएच 06 एस 8837 या क्रमांकाची राज्य परिवहन महामंडळाची बस सिरोंचाकडे प्रवासी घेऊन जात होती. या बसमध्ये 5 शालेय विद्यार्थ्यांसह 16 प्रवासी होते. दरम्यान, सिरोंचा मुख्यालयापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या आईपेठा नाल्याजवळील वळणावर अचानक बससचे स्टेरींग जाम झाल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या झाडास बसची धडक बसली. यात एसटी बसचा समोरील भाग क्षतीग्रस्त झाला. त्यामुळे बसमधून प्रवास करणारे 16 प्रवासी जखमी झाले.  घटनेची माहिती मिळताच आसरअल्ली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. जखमी प्रवाशांना प्राथमिक आरोग्य केंद्र अंकीसा येथे उचारार्थ भरती करण्यात आल्याची माहिती आहे. पुढील तपास आसरअल्लीचे प्रभारी पोलिस अधिकारी राजेश गावडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. 



No comments