Breaking News

25 वर्षे जुन्या अतिक्रमणावर चालवला बुलडोझर



-कोरची बाजार चौकात नपंची कारवाई 
GADCHIROLI TODAY
कोरची: अल्टिमेटमचा कालावधी पुर्ण होऊनही अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण न हटविल्याने नगर पंचायत प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारीत शुक्रवारी जवळपास २० ते २५ वर्षे जुन्या बाजार चौकातील अतिक्रमणावर बुलडोझर चालविला आहे. या कारवाईमुळे व्यवसायिकांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली आहे. 
कोरची शहराच्या बाजार चौकात मागील २० ते २५ वर्षांपासून शहरातील लहान-मोठे व्यवसायिक आपले दुकान थाटून उदरनिर्वाह करीत होते. मात्र, सदर जागेवर बाजार संकुल निर्माण करण्यासाठी मंजुरी मिळाल्यांनतर नगरपंचायत प्रशासनाने बाजार चौकातील अतिक्रमणधारकांना नोटीस पाठवून २ मार्चपर्यंत अतिक्रमण हटविण्याची ताकीद दिली होती. मात्र, संबंधित व्यवसायिकांनी अतिक्रमण न हटविल्याने शुक्रवारी सकाळी ९ वाजतापासून प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरु केली आहे. या कारवाईत नगरपंचायत चे मुख्याधिकारी तथा तहसीलदार माळी, नपं उपाध्यक्ष हिरा राऊत, उपमुख्याधिकारी बाबासो हाक्के यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. 

No comments