Breaking News

पाण्याच्या टाकीवरून पडून इसमाचा मृत्यू


संग्रहित छायाचित्र


GADCHIROLI TODAY
गडचिरोली : दारुच्या नशेत पाण्याच्या टाकीवर चढलेल्या निलंबित सुरक्षा रक्षकाचा खाली कोसळून मृत्यू झाल्याची घटना 2 मार्च रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास तालुक्यातील तुमरगुंडा येथे घडली. संतोष कम्मा कालगा (38) रा. तुमरगुंडा असे मृतकाचे नाव आहे.
 संतोष हा एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे सुरु असलेल्या लोहखनिज उत्खनन प्रकल्पात सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होता. मात्र महिनाभरापूर्वी कर्तव्यात कसूर करण्यात आल्याचा ठपका ठेवून त्याला व्यवस्थापनाने निलंबित केले होते. यानंतर तो सातत्याने दारु पिऊन राहत होता. दरम्यान, 2 मार्चला तो दारुच्या नशेत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या टाकीवर चढला. यावेळी तोल गेल्याने त्याचा खाली कोसळून मृत्यू झाला. घटनेबाबत एटापल्ली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनात तपास सुरु आहे.

No comments