Breaking News

गंभीर जन्मदोशाने ग्रस्त श्रीकृष्णाला 'नव संजीवनी'


GADCHIROLI TODAY 
गडचिरोली : जिल्ह्यातील बोथेळा येथील श्रीकृष्ण जगदीश कुमरे हा omphalocele या गंभीर जन्मदोशाने ग्रस्त होता. मात्र, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम  पथकाने सलग तीन वर्ष संबंधित विद्यार्थ्याचा पाठपुरावा घेऊन व लता मंगेशकर हॉस्पिटल हिंगणा, नागपुर येथे योग्यरीत्या शस्त्रक्रिया करून त्याला 'नव संजीवनी' दिली आहे. 
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत शून्य ते अठरा वर्षातील विद्यार्थ्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी करून गंभीर आजाराने ग्रस्त आढळून आलेल्या विद्यार्थ्यांना औषधोपचार तसेच शस्त्रक्रिया करण्याकरिता संदर्भ सेवा देण्यात येते. याच तपासणी दरम्यान राबस्वाका टीमला श्रीकृष्ण जगदीश कुमरे मु. बोथेळा या विद्यार्थ्यास omphalocele या गंभीर जन्मदोशाने ग्रस्त असलेले आढळून आले. सदर विद्यार्थ्यांच्या शस्त्रक्रिया करिता पालकांची समजूत घालून सतत तीन वर्षे पाठपुरावा घेऊन लता मंगेशकर हॉस्पिटल हिंगणा, नागपुर येथे योग्यरीत्या शस्त्रक्रिया करण्यात आले व कुमार श्रीकृष्णला नव संजीवनी देण्यात आली.
शस्त्रक्रियेसाठी गडचिरोली सामन्य रुग्णालयातील चमूनी लता मंगेशकर हॉस्पिटल येथे कुमार कुमार श्रीकृष्ण याला पाटवण्यात यश प्राप्त झाले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोळकी, डॉ. बागराज धुर्वे, निवासी वैद्यकीय अधिकारी तसेच लता मंगेशकर येथील पीडियाट्रिक सर्जन डॉ. अलबल व संपूर्ण शस्त्रक्रिया टीम तसेच गडचिरोली येथील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथकातील डॉ. मीनाक्षी खोब्रागडे, डॉ. संदीप सदावर्ते, लियास पठाण, नेत्रा ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments