Breaking News

Accident ऑटोरिक्षा-दुचाकीच्या धडकेत एक ठार



GADCHIROLI TODAY 
गडचिरोली : ऑटोरिक्षा व दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास अहेरी तालुक्यातील गुडेम-अहेरी मार्गावर घडली. नागेश वाकुलकर (29) रा. अहेरी असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, रविवारला सायंकाळच्या सुमारास नागेश वाकुलकर हा गुडेमवरून दुचाकीने अहेरीकडे जात असताना अहेरीपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर त्याच्या दुचाकीची ऑटोरिक्षाला समोरासमोर धडक बसली. यात नागेशचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती स्वराज्य फाउंडेशनला मिळाली असता, फाउंडेशनचे सदस्य रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले. दुर्दैवाने जागीच मृत झालेल्या नागेशचा मृतदेह घेऊन अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाकरीता दाखल करण्यात आला.

No comments