जिल्ह्यातील अवैध दारु तस्करीवर प्रतिबंध घाला : पोलिस बॉईज असोसिएशनची मागणी
गडचिरोली : गडचिरोली पोलिस ठाण्याच्या अवैध दारु विक्रेत्यांविरोधातील धडक मोहिमेमुळे गडचिरोली तालुक्यातील दारु विक्रीवर ब-याचअंशी आळा बसला होता. मात्र पुन्हा दारु माफियांकडून दारु तस्करीचे प्रमाण वाढले असल्याने यावर प्रतिबंध घालण्यासाठी शेजारच्या चंद्रपूर जिल्हा सीमेवर 24 तास चेक पोस्ट उभारण्याची मागणी पोलिस बॉईज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणेदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्यातून याच मार्गे मोठ्या प्रमाणात दारु माफियांकडून अवैधरित्या जिल्ह्यात दारुची तस्करी केली जात आहे. मागील काही दिवसांपूर्वी गडचिरोली पोलिस दलाने राबविलेल्या दारु विक्रेत्यांवरील धडक कारवाईमुळे शहरासह तालुक्यातील अवैध दारुविक्रीवर काही अंशी आळा बसला होता. मात्र, आता परत दारु माफिया गडचिरोली सक्रीय होत असल्याचे दिसत आहेत. शहरातील अनेक वार्डात दारू विक्री केली जात आहे. यात डी कंपनीचे दारू अति धोक्याची आहे. ही गंभीर बाब लक्षात घेता पोलीस बॉईज असोसिएशन गडचिरोलीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली. निवेदन सादर करताना पोलीस बॉईज असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष गिरीश कोरामी, जिल्हा उपाध्यक्ष आकाश ढाली, शहर उपाध्यक्ष ओम वट्टी, विक्रांत मडावी, प्रशांत शेडमाके, रजत कुकुडकर, विकी कडते आदी उपस्थित होते.
Post Comment
No comments