शनिवारी सर्चमध्ये पोटविकार व बालरोग ओपिडी
गडचिरोली TODAY
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील चातगाव स्थित सर्च हॉस्पिटलमध्ये शनिवार, ४ मार्च रोजी पोटविकार व बालरोग ओपिडीचे आयोजन करण्यात आले आहे.
नागपूर येथील पोटविकार तज्ञ डॉ. सिद्धार्थ धांडे व बालरोग तज्ञ डॉ. प्रतीक राऊत यांच्या सहकार्याने 'सर्च' हॉस्पिटलमध्ये नियमित 'गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी व बालरोग ओपिडीला सुरुवात करण्यात आली आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी ही ओपीडी असेल. शनिवारी होणाऱ्या ओपीडीला डॉ. सिद्धार्थ धांडे व डॉ. प्रतीक राऊत उपस्थित राहणार आहेत. तरी पचनसंस्थेशी निगडीत विकाराने त्रस्त असलेल्या जास्तीत जास्त रुग्णांनी या ओपीडीचा लाभ घ्यावा तसेच गैरसोय होऊ नये म्हणून हॉस्पिटलमध्ये पूर्व नोंदणी करावी, असे आवाहन सर्च कडून करण्यात आले आहे.
Post Comment
No comments