नक्षल्यांचे जाळपोळीचे सत्र सुरूच : पुन्हा तीन वाहनांना लावली आग
- एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलिस मदत केंद्र हद्दीतील घटना
गडचिरोली TODAY
गडचिरोली : दोन दिवसांपूर्वी नक्षल्यांनी भामरागड तालुक्यातील विसामुंडी मार्गावर नवनिर्माधिन बांधकामादरम्यान एका वाहनाची जाळपोळ केली होती. आता पुन्हा एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलिस मदत केंद्राअंतर्गत येत असलेल्या पुरसलगोंदी-अलेंगा मार्गावर सुरु असलेल्या पुल बांधकामावरील तीन वाहनांची जाळपोळ केल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, गट्टा (जांभिया) पोलिस मदत केंद्राअंतर्गत येत असलेल्या पुरसलगोंदी-अलेंगा मार्गावरील नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरु आहे. गुरुवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास 20 ते 25 च्या संख्येत असलेल्या सशस्त्र नक्षल्यांनी बांधकामस्थळ गाठले. त्यांनी बांधकामावरील पोकलेन, जेसीबी व मिक्सर मशिनला आग लावली. यात संबंधित वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या घटनेने सदर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Post Comment
No comments