दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
गडचिरोली TODAY
गडचिरोली : दहावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारला दुपारी 12 वाजताच्या दरम्यान चामोर्शी तालुक्यातील दुर्गापूर येथे घडली. कौशिस समीर बहादूर (16) असे मृतक विद्यार्थिनीचे नाव आहे.
कौशिस ही तिच्या आजोबांकडे राहत होती. आजोबा दुकानात गेले तेवढया वेळात ती घरात गेली व तिने दरवाजाची आतून कडी लावून पंख्याला गळफास घेतला. कौशिस ही बाहेर दिसत नसल्याने आजोबांनी घरात जाऊन दार ढकलले असता, ती गळफास घेऊन लटकल्याचे दिसून आले. लगेच तिला आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले. मृतक विद्यार्थिनी ही येणापूर येथील इंदिरा गांधी हायस्कूल मध्ये इयत्ता दहावीमध्ये शिकत होती. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून घटनेचा तपास पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश जंगले करीत आहेत.
Post Comment
No comments