Breaking News

चक्क कुलूपाची डुप्लिकेट चावी बनवून चोरटयांनी लांबविल्या मौल्यवान वस्तू



 - लखमापूर बोरी येथील घटना
 गडचिरोली TODAY 
गडचिरोली : प्राथमिक आरोग्य केंद्रातील कुलूपबंद निवसस्थानातून चोरट्याने चक्क कुलूपाची डुप्लिकेट चावी बनवून दरवाजा खोलून सोन्याचे दागिने व एलईडी टीव्ही असा एकूण जवळपास 90 हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी येथे उघडकीस आली.  
 प्राप्त माहितीनुसार, लखमापूर बोरी येथील आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेविका या नवीन बनलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील निवासस्थानी राहत होत्या. मागील महिन्यात आरोग्य सेविका ह्या गर्भवती असल्याने व 9 महिने झाल्याने बाळंतपणासाठी परिवारासोबत माहेरी गेल्या होत्या. दरम्यान कोट्यवधीच्या इमारतीला रात्रौच्या कर्तव्यावर कुणीच नसल्याने आरोग्य सेविका राहत असलेल्या कुलूपबंद निवसस्थानातून चोरटयांनी दरवाजा खोलून आलमारीत ठेवलेली एक तोडा सोन्याची गोप, 4 ग्राम अन्य दागिने व भिंतीला लटकवून असलेली एलईडी चोरुन नेली. दरम्यान, आरोग्य सेविका यांचे पती काही साहित्य नेण्यासाठी सोमवारी लखमापूर बोरी येथील निवासस्थानी येऊन बघितले असता, त्यांना टीव्ही व सोने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यांनी लगेच चामोर्शी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. सदर घटनेने लखमापूर बोरी परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

No comments