Breaking News

शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीत दोन गटात चुरस


मतदान केल्याची खूण दाखविताना मतदार

GADCHIROLI TODAY
कुरखेडा : स्थानिक जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीत रविवारी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था कुरखेडा, कोरचीच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली . यावेळी शिक्षकांच्या दोन गटात मोठी चूरस असल्याचे दिसून आले.
 पतसंस्थेच्या 15 सदस्यीय संचालक मंडळाकरीता सार्वत्रिक निवडणुकीत विद्यमान सत्ताधारी प्राथमिक शिक्षक समिती व प्राथमिक शिक्षक समन्वय परिवर्तन पॅनल समोरासमोर ठाकल्याने निवडणुकीत मोठी चूरस निर्माण झाली होती. मागील पंधरा दिवसांपासून दोन्ही गटाने कुरखेडा व कोरची तालुक्यात प्रचाराचा धूराळा उडविला होता. एकूण 15 संचालक मंडळाच्या निवडणुकीत दोन्ही गटाकडून प्रत्येकी 15 व 3 अपक्ष असे एकूण 33 उमेदवार भाग्य आजमावत आहेत. येथे एकूण 640 मतदार संख्या असून त्यापैकी 629 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदान केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी सुशिल वानखेडे यांनी जबाबदारी पार पाडली. 

No comments