शेतातील झाडाला गळफास घेऊन वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : शेतातील झाडाला गळफास घेऊन एका वृद्ध शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील मुडझा येथे मंगळवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. मधुकर सिताराम सोनुले (62) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मधुकर सोनुले हे सकाळीच घराबाहेर पडले. दरम्यान त्यांनी शेत गाठित शेतातील पिंपळाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. रंगपंचमीचा दिवस असल्याने ते गावातच रंग खेळत असतील, असा तर्क कुटूंबियांनी काढला. मात्र दुपार होऊनही ते न परतल्याने त्यांचा सर्वत्र शोधाशोध सुरु झाला. अशातच शेतात जाऊन बघितले असता ते झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत निदर्शनास आले.
घटनेची माहिती गावातील पोलिस पाटील यांनी गडचिरोली पोलिस ठाण्याला दिली. ठाण्याचे बीट जमादार म्हरसकोल्हे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. पुढील तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत. मधूकर सोनुले यांना 4 एकर शेती आहे. मागील दोन वर्षापासून त्यांना नापिकीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे ते कर्जाच्या खाईत लोटले होते. याच चिंतेत त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी गावात चर्चा आहे.
Post Comment
No comments