Breaking News

कुरखेडातील ग्रीन पार्क मैदानात हाईमास्ट लाईटची व्यवस्था करा : आम आदमी पार्टी



GADCHIROLI TODAY
कुरखेडा : स्थानिक ग्रीन पार्क मैदान येथे हाईमास्ट लाईट लावण्याची मागणी आम आदमी पार्टी कुरखेडा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी नपं मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.            
कुरखेडा येथील एकमेव खेळ मैदान असलेले ग्रीन पार्क मैदान येथे लाईटची सोय उपलब्ध नसल्याने रात्रौ अंधार राहतो. त्यामुळे सदर ठिकाणी स्ट्रीट लाईट किंवा हाईमास्ट लावून अंधाराची समस्या दूर करण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून केली आहे. निवेदन सादर करतेवेळी तालुका संयोजक ईश्वर ठाकूर , शाहजाद हाशमी, हिरा चौधरी, ताहीर शेख, दीपक धारगाये, राहुल दांडेकर आदी उपस्थित होते.

No comments