जिमलगट्टा येथील अवैध दारूविक्री बंद करा : जागतिक महिलादिनी पोलिस विभागाला निवेदन
-मुक्तीपथ गाव संघटनेची मागणी
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथील चोरट्या मार्गाने अवैधरीत्या दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मुक्तीपथ गाव संघटनेच्या महिलांनी केली. यासंदर्भातील निवेदन जागतिक महिलादिनी जिमलगट्टा उप पोलिस स्टेशनला सादर करण्यात आले.
निवेदनात म्हंटले आहे की, पोलिस विभाग व गाव संघटनेच्या प्रयत्नांतुन गावातील अवैध दारूविक्रीचे प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले होते. मात्र, काही विक्रेत्यांनी चोरट्या मार्गाने दारू विक्री करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चोरट्या मार्गाने विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून गाव दारूमुक्त करावे व गावात शांतता, आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करावी, अशी मागणी गाव संघटनेच्या महिलांनी जागतिक महिला दिनी पोलिस विभागाला सादर केलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देतांना मुक्तीपथ गाव संघटनेच्या महिला उपस्थित होत्या.
No comments