भिषण आगीत घर जळून खाक
GADCHIROLI TODAY
अहेरी : तालुक्यातील छल्लेवाडा येथील एका घराला अचानक आग लागल्याने संपूर्ण घर जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. यामुळे आगग्रस्त कुटूंब उघड्यावर आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, छल्लेवाडा येथील रहिवासी यशोदाबाई पोमा अजमेरा यांच्या घराला शुक्रवारच्या रात्री अचानक आग लागली. गाढ झोपेत असलेल्या अजमेरा कुटूंबियांना आग लागल्याचे लक्षात येताच संपूर्ण कुटूंब खळबळून जागे झाले. मात्र काही कळण्यागोदरच घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्याने अजमेरा कुटूंबियांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. आगीत घरातील अन्नधान्य व इतर सर्व साहित्य जळाल्याने कुटूंबिय उघड्यावर आले आहे.
Post Comment
No comments