Breaking News

रविवारी 'स्वच्छ जल स्वच्छ मन' अभियानाची सूरवात



-संत निरंकारी मिशनचा पूढाकार
गडचिरोली TODAY
 कुरखेडा : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त संत निरंकारी मिशन शाखा कूरखेडाचा वतीने रविवारी देऊळबोडी येथे 'स्वच्छ जल स्वच्छ मन' या अभियानाचा शूभारंभ करण्यात येणार आहे
 संत निरंकारी मिशन द्वारे सदगूरू माता सूदीक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनात सामाजिक उत्तरदायित्वाचा भावनेतून नैसर्गिक व मानव निर्मित जल स्त्रोताची संरक्षण व स्वच्छता हा उपक्रम स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त देशातील २७ राज्यातील ७३० शहरात ११०० ठिकाणी राबविण्यात येत आहे. या अंतर्गत समूद्रतट, नदी, बोडी, झील, तलाव, विहीर, सार्वजनिक पाण्याची टाकी तसेच अन्य जलस्त्रोताचे संरक्षण व स्वच्छता अभियान राबविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मानवी जिवनात पाण्याचे महत्व टिकवून ठेवण्याकरीता जनजागृती मोहीम सूद्धा मिशनद्वारे सूरू करण्यात आलेली आहे. मिशन द्वारे शहरातील देऊळबोडी येथे अभियानाचा शूभारंभ होणार आहे. यावेळी ४ तास स्वच्छता अभियान निरंकारी स्वंयसेवक श्रमदान करीत राबविणार आहेत तसेच जनजागृती करीता विविध प्रचार प्रसार माध्यमाद्वारे जल संरक्षणाचा व स्वच्छतेचा संदेश देण्यात येणार आहे .

No comments