VIRAL VIDEO : तळेगाव-मौशि मार्गावर बिबट्याचे दर्शन
VIRAL VIDEO : तळेगाव-मौशि मार्गावर बिबट्याचे दर्शन
कुरखेडा : जिल्ह्यात नरभक्षी वाघांची प्रचंड दहशत कायम असतांना तालुक्यातील तळेगाव-मौशी मार्गावर काही व्यक्तींना बिबट्याचे दर्शन घडून आले. या बिबट्याचे मोबाईल चित्रकीकरण समाज माध्यमावर पसरले असून तो सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे या मार्गाने ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी नेहमीच प्रवास करीत असल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार विजय लाडे व त्यांचे काही सहकारी मित्र गुरवार 26 जानेवारी रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास चारचाकी वाहनाने तळेगाव-मौशी मार्गाने मार्गक्रमण करीत असतांना रस्त्यावरुन मार्गक्रमण करणारे बिबट त्यांना निदर्शनास आले. त्यांनी या बिबट्याचा मोबाईलवर चित्रीकरण करुन ते समाजमाध्यमावर टाकले. तसेच याची माहिती त्यांनी तळेगाव वासीयांना दिली. सदर मार्गावर मागील काही दिवसांपासून वन्यप्राण्याच्या दर्शन घडून येत आहेत. अशातच हिंस्र अशा बिबट या परिसरात आढळून आल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. विशेष म्हणजे याच मार्गानी ग्रामस्थ तसेच शाळकरी विद्यार्थी नेहमीच ये-जा करीत असतात. अशातच बिबट्याच्या मुक्त संचाराने मानवावर हल्ला होऊन अनुचित घटना घडण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे वनविभागाने तत्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी तळेगाव-मौशी गावातील ग्रामस्थांकडून होत आहे.
No comments