संस्कृतीच्या माध्यमातून चांगले संस्कार घडावे : माजी जिप अध्यक्ष कंकडालवार
-चिरेपली येथे वीर बाबूराव शेडमाके स्मारकाचे उदघाटन
GADCHIROLI TODAY
अहेरी : धर्म आणि संस्कृती माणसाला जगण्याची दिशा देतात. त्यामुळे प्रत्येक समाजातील लोकांनी आपले धर्म आणि संस्कृतीचे चिकित्सक दृष्टीकोन तपासणी करून चांगल्या गोष्टीचे जतण केले पाहिजे, त्यातूनच येणाऱ्या पिढीला चांगले संस्कार देता येईल, असे प्रतिपादन माजी जिप अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले.
अहेरी तालुक्यातील चिरेपली येथे आदिवासी समाजाचे प्रतिक असणाऱ्या सल्लागागरा व वीर बाबूराव शेडमाके यांच्या स्मारकाच्या उदघाटन सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाचे उदघाटन बीरस बिग्रेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश पेंदाम यांनी केले. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, खांदलाचे सरपंचा सुमन आलाम, राजारामचे सरपंच नागेश कन्नाके, मेडपलीचे सरपंच निलेश वेलादी, गटाचे सरपंचा जेट्टी, सामाजिक कार्यकर्ता मौकाशी प्रमुख्याने उपस्थित होते.
Post Comment
No comments