Breaking News

शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 'चक्काजाम' : आम आदमी पक्ष



GADCHIROLI TODAY 
कुरखेडा : कृषिपंपासाठी दिला जाणारा 8 तासाचा विद्युत पुरवठा वाढवून 16 तास करावे, अन्यथा 15 मार्चला गेवर्धा येथील गुरनोली फाट्याजवळ सकाळी 11 वाजता पासून चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा आम आदमी पार्टीने दिला आहे. यासंदर्भातील पत्र तहसीलदार व पोलिस स्टेशनला सादर करण्यात आले आहे. 
 कुरखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपांसाठी केवळ आठ तास विद्युत पुरवठा दिला जात आहे. यामुळे उन्हाळी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची शेतपिके करपण्याच्या परिस्थितीवर आहेत. सदर 8 तासाचा विद्युत पुरवठा 16 तास न केल्यास शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला समोर जावे लागेल. यापूर्वी 12 तास विद्युत पुरवठा असल्याने शेतकऱ्यांनी दुबार पेरणीचे धाडस केले, परंतु मागील एक महिन्यापासून कृषी जोडणी असलेल्या विद्युतपंपांना केवळ 8 तास वीज मिळत असल्यामुळे आवश्यकतेप्रमाणे शेतातील पिकांना पाणी देणे शक्य होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक करपण्याची स्थितीत आले असून या विषयावर तत्काळ निर्णय घेऊन सदर वीज पुरवठा 16 तास न केल्यास शेतकऱ्यांच्या हातातून पीक निघून जाईल. सदर अन्यायपूर्ण बाबीचा पुनर्विचार करावा व कृषिपंपांना 16 तास वीज पुरवठा करण्यासाठी योग्य तो निर्णय घ्यावा, या मागणीसाठी आम आदमी पार्टी आंदोलन उभा करणार आहे.

No comments