एकाग्रता वाढवण्यासाठी नियमित ध्यान करावे : वर्षा कोल्हे
-रासेयो शिबिरातून विद्यार्थ्यांशी साधला संवाद
गडचिरोली TODAY
गडचिरोली : रोजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत मेडिटेशन म्हणजेच ध्यान केल्याने तणाव दूर करण्यास मदत होते. जेव्हा आपली इंद्रिये सुस्त किंवा कंटाळवाणी होतात, तेव्हा ध्यान आपल्याला आपली जागरूकता वाढवण्याची संधी देते. ध्यान केल्यामुळे सकारात्मक विचार वाढायला लागतात, आत्मविश्वास वाढतो, एकाग्रता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमित ध्यान करावे, असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकारी वर्षा कोल्हे यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठातील पदव्युत्तर शैक्षणिक विभागातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसीय विशेष वार्षिक शिबिर मूरखळा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेत पार पडले. या शिबिरा दरम्यान स्वंयसेवकाना 'मानवी जीवनात ध्यानाचे महत्त्व' या विषयावर त्यांनी संवाद साधला तसेच ध्यान कसे करायचे या विषयीचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रमोद जावरे, सह कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. वैभव मसराम, प्रा. डॉ. स्मिता लाडे आणि प्रा. डॉ.राठोड उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मेडिटेशन शिकायला मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
Post Comment
No comments